बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (17:53 IST)

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी

cbi officer
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी बजावले आहे.
 
सुशांतसिंह यांने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. सुशांतसिंह आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करीत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार राज्यातील पाटण्याचे पोलीस मुंबई येऊन तपास आणि चौकशी करीत होते. दरम्यान, कोविड-१९च्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेने राज्य शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले होते. यावरुन वाद निर्माण झाला. त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले होते.