शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (14:48 IST)

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनानं मोडले सर्व विक्रम

दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, करोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव आता चिंतेचा विषय ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
 
तर शुक्रवारीही भारतात करोनाचे ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातीलकरोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.