1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (11:57 IST)

नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातून १९१ किलो ड्रग्स जप्त, १ हजार कोटी किंमत

191 kg of drugs
नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून १९१ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. समुद्रमार्गे हे हेरॉइन पाठवण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत १ हजार कोटी रुपये आहे.  
 
डीआरआय, न्हावा-शेवा आणि कस्टम असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. अफगाणिस्तानातून हा माल आल्याची शक्यता आहे.
 
कंटेनरमधील माल मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना डीआरआयने मुंबईतून अटक केली. या प्रकरणी दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.