1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 5 जानेवारी 2021 (14:49 IST)

मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा, आता पुढे भाजप काय करणार?

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाहून सर्वच पक्षांनी समाजाला जोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुंबईतील बहुतेक गुजराती समाज भाजपला मत देतो. शिवसेनेने आता गुजराती कार्ड खेळले आहे. 'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा, गुजराती भाषिकांना जोडण्यासाठी शिवसेना मतदारसंघ हेमराज भाई शहा यांच्या नेतृत्वात गुजराती बांधवांना शिवसेनेत आणण्यासाठी मुंबईत 10 जानेवारी रोजी खास मेळाव्याचे आयोजन केले आहे.
 
शिवसेनेच्या या गुजराती पॅटर्नला भाजप काय उत्तर देणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. 10 जानेवारी रोजी गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंपासमोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.