गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:01 IST)

Mumbai Mega Block : रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक'

local train mumbai
रेल्वेच्या मध्य मार्गावर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे. तशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल-वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेने तश्या सूचना जारी केल्या आहेत. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी, ठाणे-वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील.त्यामुळे लोकल ट्रेन या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील..
 
आज रविवार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा मेगाब्लॉक आहे. काही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. तर काही मार्गांवर वाहतूक सुरळीतपणे सुरु असणार आहे. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. तशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे.माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. पनवेल येथून सकाळी10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
 
 पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवाही उपलब्ध असतील.
 
पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीतपणए चालणार आहे. वसई रोड यार्डासाठी दिवा मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.