बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (21:17 IST)

मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ‘म्याव म्याव’जप्त; केमिस्ट्रीचे उच्च शिक्षण घेतलेला तरुण जेरबंद

arrest
मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मोठी कारवाई केली आहे. एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून तब्बल १४०० कोटी रुपये किंमतीचे ७०० किलो ‘मेफेड्रोन’जप्त केले आहे. हे ड्रग म्याम म्याव म्हणून ख्यात आहे.  एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा केमिस्ट्रीचा पदव्युत्तर पदवीधर आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) या युनिटवर छापा टाकला, असे त्यांनी सांगितले.
 
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला. तेथे प्रतिबंधित औषध ‘मेफेड्रोन’ तयार करण्यात आल्याचे आढळून आले. अलीकडच्या काळात शहर पोलिसांनी पकडलेले हे सर्वात मोठे अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मेफेड्रोन’ला ‘म्याव म्याऊ’ किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. ह ड्रग कुणाला विक्री होत होते, कुठे विक्री व्हायचे यासह अनेक बाबींचा उलगडा तपासातून होणार आहे.