सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (08:26 IST)

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेची नोटीस

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा  यांना आता मुंबई महापालिकेने  नोटीस बजावली आहे. 4 मे ला फ्लॅट तपासणीसाठी येत असल्याची माहिती या नोटीसीत देण्यात आली आहे. खारमधील घराला ही नोटीस बजावली आहे.
 
राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. याआधी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण ( केल्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता आज त्यांना जामीन मिळणार होता.मात्र राणा दाम्पत्याचा  कोठड़ीतील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. त्यानंतर आता त्यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.
 
राणा दाम्पत्यांच्या खारमधील घराला आता मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याच्या घरावर ही नोटीस चिकटवली आहे. या नोटीसीनुसार आता मुंबई महापालिकेच पथक 4 मे ला फ्लॅट तपासणीसाठी येणार आहेत.त्यामुळे आता या तपासणीत काय बाहेर येते ? त्याचबरोबर राणा दाम्पत्य यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.