सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (08:13 IST)

येत्या 10 मे रोजी मुंबई विमानतळावरुन प्रवास करणार आहात? मग हे वाचा

येत्या 10 मे रोजी जर आपण मुंबई विमानतळावरुन प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, येत्या 10 मे रोजी मुंबई विनमातळावरील दोन्ही धावपट्ट्या (रन वे) बंद राहणार आहेत. त्यामुळे ज्यांनी यापूर्वीच विमान प्रवासाचे बुकींग केले आहे त्यांना आता संबंधित विमानसेवा कंपनीशी संपर्क साधावा लागणार आहेत. विमानतळ प्रशासनाकडून पावसाळी पूर्व विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. धावपट्टी लगत असलेल्या विविध नाल्यांची आणि अन्य बाबींची साफसफाई यात करण्यात येणार आहे. त्यासाठीच 10 मे रोजी दिवसभर धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.