शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2024 (09:26 IST)

मुंबई वाहतूक पोलिसांनी आषाढी एकादशी यात्रे निमित्त नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली

mumbai police
Mumbai Aashadhi Ekadashi yatra :आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यात काढण्यात येणाऱ्या 'आषाढी एकादशी यात्रे'साठी मुंबई पोलिसांनी वाहतूक ॲडव्हायझरी जारी केली आहे. शहरातील वडाळा परिसरात बुधवारी मोठ्या संख्येने वारकरी जमणार आहे. 

मुंबईत आषाढी एकादशी यात्रे निमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात भाविक एकादशी निमित्त मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी या भागातील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे. की, 17 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार असून रस्त्यावरील वाहतुकाची कोंडी होऊ नये वाहतूक विस्कळीत होऊ नये या साठी शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यानुसार 16 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 18 जुलै सकाळी 8 वाजे पर्यंत अनेक रस्ते बंद राहणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit