1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2024 (12:36 IST)

मुंबई वर्ली हिट अँड रन केसमध्ये आरोपी मिहिर शाह याला सात दिवसांची पोलीस रिमांड

मुंबई मधील चर्चित वर्ली हिट अँड रन केसमध्ये कोर्टाने आरोपी मिहिर शाह याला सात दिवसांसाठी पोलीस रिमांड मध्ये पाठवले आहे. बी.एम.डब्ल्यू. कार दुचाकीला धडक देत महिलेला चिरडले या आरोपाखाली मिहिर शाहला पोलिसांनी 9 जुलैला संध्याकाळी विरारमधील एक फ्लॅटमधून अरेस्ट केले.
 
मुंबई वर्ली हिट एंड रन केस मध्ये कोर्टाने आरोपी मिहिर शाह याला  सात दिवसांसाठी पोलीस रिमांड मध्ये पाठवलं आहे. कोर्टामध्ये पोलीस म्हणाले की, हा पत्ता लावायचा आहे की अपघाताच्या वेळी आरोपीने गाडीची नंबर प्लेट कुठे सोडली होती. अपघातानंतर आरोपीने कोणाशी संपर्क केला, कोणी आरोपीची मदत केली? यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस रिमांड मध्ये दिले आहे.
 
पोलीस 16 जुलै पर्यंत मिहिर शाहची अनेक चौकशी करू शकतील. मिहिर शाहची रिमांड 16 जुलैला संपेल. मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयामध्ये मिहिर शाहयाला सादर केल्या नंतर पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीने अपघात वेळी गाडी नंबर प्लेट फेकून दिली होती. अपघातात असलेली कार कोणाच्या नावावर आहे. या अनेक चौकश्या करण्यासाठी न्यायालयाने मिहीर शाह याला पोलीस रिमांड दिली आहे .