मुंबईकरांना झटका, बेस्ट बसच्या तिकिटाचे दर वाढले
सध्या महागाई वाढतच आहे. आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवाशी लोकल रेल, बस मधून प्रवास करतात.मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचे तिकिटाचे दरात वाढ करण्यासाठी महापालिकेने मंजुरी दिली असून आता मुंबईकरांना बेस्ट बसच्या तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे.
या दरवाढीची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. बेस्ट प्रशासनाने खर्च वाढ आणि आर्थिक तूट असल्याचेमुळे दरवाढी करण्याचे सांगितले आहे .
सध्या साध्य बसेस साठी किमान आकारले जाणारे बस भाडे आता दुपटी ने वाढणार. पाच रुपये बसभाडे साठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहे. तर एसी बसचे भाडे सहा ऐवजी 12 रुपये लागणार आहे. या दरवाढीची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे.
बेस्ट बसच्या दरवाढीमुळे महसुलात वाढ होणार आहे. मात्र याचा फटका बेस्ट बसच्या प्रवाशांना बसणार आहे
Edited By - Priya Dixit