शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (16:49 IST)

मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट एका आठवड्यासाठी पूर्पणणे बंद

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट एका आठवड्यासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 
 
सोमवारपासून म्हणजे 11 मे ते 17 मे पर्यंत पाचही मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान व्यापारी, कामगारांची तपासणी केली जाणार आहे.
 
गेल्या दोन आठवडय़ांत एपीएमसीत करोना रुग्ण वाढू लागले आहेत. नवी मुंबईत एपीएमसी बाजार आवारातील संसर्गाचे ७९ रुग्ण झाल्याने काळजी वाढत चालली आहे. हे मार्केट खूप मोठं असून येथून नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्य़ातही संसर्ग पोहचत असल्याचे समोर आले आहे. 
 
एपीएमसीतील फळ बाजारात मंगळवारी वेंगुर्ले येथील आंब्याचा ट्रक घेऊन आलेल्या एका चालकाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे हा धोका लक्षात ‘क्लोज एपीएमसी, सेव नवी मुंबई’  अशी मोहीम सुरु झाली होती. यानंतर प्रशासनाने मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.