मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (09:40 IST)

नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी !

मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. ही चौकशी कोणत्या विषयात सुरू आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाचे पथक पहाटे नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडी कार्यालयात गेले आहेत.
 
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले होते. एका मालमत्तेतील अंडरवर्ल्ड संबंधांच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी ईडी अधिकाऱ्यांची इच्छा होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नवाब मलिकच्या या जमिनीत अंडरवर्ल्डच्या लोकांचाही सहभाग असण्याची शक्यता ईडीला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची ही जमीन कुर्ला परिसरात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत पत्रकार परिषदही घेतली होती.