मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (23:36 IST)

वरळी आगीच्या घटनेत वाचलेल्या 5 वर्षीय मुलाला शिवसेनेने दत्तक घेतले -किशोरी पेडणेकर

वरळी चाळीतील आगीच्या घटनेत वाचलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च शिवसेना उचलणार आहे, या मुलाला शिवसेनेने दत्तक घेतल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी सांगितले.
 
वरळी आगीच्या घटनेत वाचलेल्या 5 वर्षीय मुलाच्या शिक्षणाचा खर्च शिवसेना उचलणार आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 30 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबियांच्या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालिकेला तब्बल दोन महिन्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईच्या वरळी येथील एका चाळीत गॅस सिलॅन्डरचा स्फोट झाल्याने आग लागली.
 
30 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले, काही दिवसानंतर तिघांचा मृत्यू झाला. या मध्ये 5 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही गंभीर होती. या मुलाला दोन महिन्यांपासून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
 
आम्ही या मुलाला दत्तक घेतले असून  तो आता आपल्या आजोबांकडे पुण्यात राहणार आहे. या मुलाच्या नावावर आम्ही 15 लाख रुपयांचा निधी ठेवला आहे. दर महिन्याला तिच्या खात्यात 5 ते 10 हजार रुपये पाठवले जाणार असून त्याच्या  शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना घेणार आता हा  चिमुकला शिवसेनेचा आहे. आम्ही आता त्याचा सांभाळ करू.