मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:16 IST)

नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात

Water cut once a week in Navi Mumbai
नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात  करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट शहवासीयांवर आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 20 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र काही भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विभागवार आठवड्यातून एकवेळ संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून ऐरोली भागातून सुरू होणार आहे.
 
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून आणि एमआयम्डीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मोरबेतून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण एमआयडीसीतून 80 दशलक्ष लीटरऐवजी 60 ते 62 दशलक्ष लीटर पुरवठा होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सुरळीत पाणी देण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.