बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (15:10 IST)

नवाब मलिकांचे दरेकरांना आव्हान; आ देखें ज़रा किसमें कितना है दम !

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांविरोधात १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे.
प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरुन माहिती देताना सांगितले की, नवाब मलिकांविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. आता दरेकरांच्या याच ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय.
नवाब मलिक यांनी दरेकरांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांना थेट आव्हानच दिलं आहे. ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम’ अशा कॅप्शनसह मलिकांनी दरेकरांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकरांनाही टॅग केलं आहे.
अब्रुनुकसानीचे आरोप अजिबात मान्य नाहीत
भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी माझ्यावर करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा आरोप अमान्य असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणात मलिकांनी माझगाव न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला सादर करू. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.