सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:12 IST)

एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक, मंत्रालयावर जाणारा मोर्चा अडवला

आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक देणार आहेत. मात्र आज होणारे आंदोलन सरकारतर्फे दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आज होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक एसटी कर्मचारी हे पनवेल येथे आले असता पोलिसांमार्फत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येतंय.
 
पोलिस बंदोबस्त लावत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असून कर्मचारी पनवेल एसटी डेपोत आंदोलन करत आहेत. तर वाशी टोल नाक्यावर देखील पोलिस आंदोलांकर्त्यांची धरपकड करत असून त्यांना वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूल मध्ये ठेवण्यात आले आहेत