मुंबई विमानतळावर २० कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, तीन जणांना अटक
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने २० कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉक आणि हाँगकाँगहून येणाऱ्या तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या कारवाईत, सीमाशुल्क विभागाने अंदाजे २० कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. एक बँकॉकचा आणि दोन हाँगकाँगचा. बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशाकडे ११.९२२ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळला, तर हाँगकाँगहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे ७.८६४ किलोग्रॅम आढळला.
Edited By- Dhanashri Naik