1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:12 IST)

कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारले, गुन्हा दाखल

Puppy killed with poison
मुंबईमधील कांदिवली पश्चिम येथे कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारण्यात आले आहे.  याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
 
तक्रारदार माधवी शेट्ट्ये या कांदिवली येथील रहिवासी आहेत. त्या परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना खायला घालतात. ते राहात असलेल्या जीवन आशा सोसायटीसमोर एक कुत्री व तिच्या सहा पिल्लांना त्या खायला घालायच्या. त्यातील एक पिल्लू  रस्त्यावर निपचित पडले होते. पिल्लाला कोणीतरी मारल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पिल्लाच्या अंगावर कोणीही जखम नव्हती. त्यामुळे पिल्लाला कोणीतरी औषध देऊन मारल्याचा त्यांना संशय आला. अखेर वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शेट्ट्ये यांनी याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली.