सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (23:47 IST)

swine flu : कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू

सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमी झाल्यावर आता स्वाईनफ्लू ने डोके वर काढले आहे. कल्याण-डोंबिवली आतापर्यंत 48 जणांना फ्लूची लागण झाली आहे. तर स्वाईन फ्लू रुग्णामधील 29 जण बरे झाले आहेत. तसेच रुग्णायात अजून 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळून येऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.सध्या ठाण्यात स्वाईनफ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून आज कल्याण-डोंबिवलीत स्वाईनफ्लू मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 
 
सध्या ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. आज कल्याण डोंबिवलीत स्वाईनफ्लूमुळे दोन रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. या दोघांपैकी एक डोंबिवलीतील रहिवासी तर एक जण कल्याण पश्चिम मधील रहिवासी होते. केडीएमसी क्षेत्रात आता पर्यंत स्वाईनफ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिली.