शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (15:14 IST)

मुंबईत 'स्वाईन फ्लू' च्या रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ

कोरोना नंतर आता मंकी पॉक्स आणि स्वाईनफ्लू च्या आजारात वाढ होत आहे. मुंबईत संज्ञा स्वाईनफ्लूचा धोका वाढत असून या 8 दिवसांतच H1N1 च्या रुग्णसंख्येत पाच पटीने वाढ झाली असून मुंबईकरांची चिंता वाढली आहे. आता सध्या मुबंईत स्वाईनफ्लूचे 62 रुग्ण आहेत. 
 
स्वाईन फ्लू'चा (Swine flu) प्रसार वाढू लागला असून 17 जुलैपर्यत 11 रुग्ण आढळले होते. याचा प्रसार वाढला असून 24 जुलैपर्यंत रुग्णसंख्या62 वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत यामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही
 
येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे  आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. 

स्वाईन फ्लूची लक्षणे काय?
ताप, खोकला, घसादुखी, डोकेदुखी, अंगदुखी, उलटय़ा, जुलाब ही स्वाईन फ्लूची सर्वसाधारण लक्षणे आहेत. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
 
खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ करावे, डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत. असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.