मुंबईत स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या शंभरच्या वर

swine flue
Last Modified मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (21:01 IST)
मुंबईमध्ये
महिनाभरात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेली असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर गेल्या महिन्याभरात मलेरीयाच्या रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर गेली आहे. तर गॅस्ट्रो आजाराच्या रुग्णांची संख्या तर सहाशेच्या वर गेलेली आहे. यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून गेल्या एक महिनाभरातील

रुग्णांचा
आकडा जाहीर करण्यात आला आहे.

जुलै महिन्यातील रुग्णांची आकडेवारी

मलेरीया - ५६३, लेप्टो - ६५, डेंग्यू - ६१, गॅस्ट्रो - ६७९, हॅपटीटीस - ६५, चिकुणगुनया - २, स्वाईन फ्लू - १०५

दरम्यान एकाही रुग्णाचा कोणत्याही आजारामुळे मृत्यू झालेला नाही. जून महिन्यात स्वाईन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढलेले. तर मलेरीयाचे जूनमध्ये ३५० रुग्ण होते. दरम्यान मलेरीया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेनेदेखील नागरिकांसाठी मार्गर्दशक सूचना जारी केल्या आहेत.
स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सूचना

* शिंकताना आणि खोकताना नाक रुमालाने किंवा टिश्यूने झाका

* आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धुवा

* आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आणि जवळच्या महापालिकेच्या आरोग्य पोस्ट/दवाखाना/रुग्णालयाचा त्वरित सल्ला घ्या
* उच्च ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचेचा किंवा ओठांचा निळा रंग पडल्यास उपचारासाठी डॉक्टरांकडे जा

* उपचारास विलंब होऊ नये कारण यामुळे गुंतागुंत निर्माण होते आणि मृत्यूचा धोका असतो

* डेंग्यू, मलेरिया रोगांच्या प्रतिबंधासाठी सल्ला

* डास चावण्यापासून दूर राहण्यासाठी बेड नेट, खिडकीचे पडदे आणि संपूर्ण कपडे वापरण्याचा सल्ला

* परिसर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
* विषम वस्तू जसे की टिन्स, थर्माकोलचे बॉक्स, नारळाची टरफले, टायर, न वापरलेले सामान इत्यादी साफ करून अळ्यांच्या प्रजननास प्रतिबंध करा

* गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड रोगांच्या प्रतिबंधासाठी सल्ला

* रस्त्यावरील अन्न सेवन टाळा

* अन्न सेवन करण्यापूर्वी हात धुणे किंवा स्वच्छता करणे आवश्यक आहे


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

WhatsApp Call Record: व्हॉट्सअॅप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? ...

WhatsApp Call Record: व्हॉट्सअॅप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? सोप्या युक्त्या अवलंबवा
How To Record WhatsApp Calls: व्हॉट्सअॅपहे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे जे अनेक लोकांनी ...

Uday Lalit :सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळित होणार ...

Uday Lalit :सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळित होणार सरन्यायाधीश
देशातील अनेक नामवंत कायदे तज्ज्ञांनी आतापर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून धुरा सांभाळली ...

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा शरद ...

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा शरद पवार यांचे भाष्य
सध्या धनुष्य बाण कोणाचा या वर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सर्वोच नायायालयात सुरु ...

Chess Olympiad: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला ...

Chess Olympiad: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला विभागात कांस्यपदक
भारत 'ब' संघाने मंगळवारी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या गटात कांस्यपदक पटकावले, तर ...

Nashik : बाल्कनीतून तोल जाऊन दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Nashik : बाल्कनीतून तोल जाऊन दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Baby Girl falling from building : घरात लहान मुलं असतात तर त्यांच्या कडे बारीक लक्ष ...