संबंधित माहिती
- सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
- साप चावल्यानंतर तातडीने काय करायचं?
- देशात मंकीपॉक्स विषाणूमुळे एका रुग्णाचा मृत्यू, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि प्रतिबंधाच्या पद्धती
- अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा गुरू अयमान अल्-जवाहिरी ठार
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा
संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू असून याप्रकरणी काही लोकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी आज सकाळी ८.३० ते ९.३० वाजता कोठडीत भेट घेतली. राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केला होता. यातच आता मुंबईतील दोन ठिकाणी छापे मारले असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी शिवेसना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहे. रविवारी सकाळी भांडूपच्या मैत्री बंगल्यावर ईडीने छापे मारले. त्याचवेळी दादरच्या गार्डन पार्कवरही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. तसेच, गोरेगाव येथेही ईडीने धाड मारली. भांडूपच्या घरात साडेअकरा लाखांची कॅश सापडल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. तिथेही त्यांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, पीएमएलए कोर्टाने त्यांना चार ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे.
