1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (13:48 IST)

Rain in Mumbai मुंबईत मान्सूनआधी पहिला पाऊस, लोकांना उष्णेतपासून दिलासा मिळाला

Rain in Mumbai बुधवारी सकाळी मुंबईतील अनेक भागात मान्सूनपूर्व पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाडा आणि आर्द्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला. सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईच्या काही भागात हलका पाऊस सुरू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्याने सांगितले की, दादर, कांदिवली, मागठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर या शहरातील अनेक भागांमध्ये सकाळी 7 ते 8 या वेळेत 4 मिमी ते 26 मिमी पाऊस झाला.
 
वाहतूक आणि रेल्वे सेवा सामान्य: मध्य आणि दक्षिण मुंबईच्या काही भागात हलका पाऊस झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, शहरात रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सामान्य आहेत. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होतो. गेल्या महिन्यात मुंबईत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला, ज्यामुळे घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला.