1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जून 2024 (14:33 IST)

Mumbai: बर्थ-डे वर उशीरा आला केक, नाराज व्यक्तीने पत्नी आणि मुलावर केला चाकूने हल्ला

crime
वाढदिवसाचा केक उशिरा आल्याने डोक्यात राग घालून एका व्यक्तीने त्याच्याच पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला केला. 
 
महाराष्ट्रामधील मुंबई मध्ये एक भयंकर घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी केक उशिरा आल्याने एका व्यक्तीने स्वतःच्याच पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झालेत. 
 
एका पोलीस अधिकाराने सांगितले की, या 45 वर्षीय आरोपीची ओळख मुंबई मधील साकीनाका येथे राहणार्या राजेंद्र शिंदे नावाने झाली आहे. या आरोपी विरोधात पोलिसांनी केस नोंदवून घेतली आहे व जखमी महिला आणि तिच्या मुलाला रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीचा वाढदिवस होता व या आरोपीच्या पत्नीला कामावरून यायला उशीर झाला. त्यामुळे  ती दुसऱ्या दिवशी साजरा करणार होती. पण केक उशिरा आल्याने हा आरोपी पत्नीशी वाद घालू लागला. यामध्ये त्याला राग अनावर झाल्याने त्याने थेट पत्नीवर आणि मुलावर चाकूने हल्ला केला. हे कृत्य करून आरोपी फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.