रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे अध्यक्ष सहदेव बेटकर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस गटाला मोठा धक्का दिला आहे.रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सहदेव पेटकर यांनी काँग्रेसला राम राम करत शिवसेना युबीटी मध्ये आज प्रवेश केला.उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.ठाकरे म्हणाले, पेटकर हे मूळचे शिवसैनिकच होते काही मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
आज मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कोकण काबीज करण्याचे सांगितले. ते म्हणाले, काही लोक शिवसेनेतून गेल्यावर मोठे झाले पण त्यांना ज्यांनी मोठे केले ती माणसे माझ्या सोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे. दुसरी शिवसेना गद्दारांची आहे. आता पुन्हा कोकणाचा पक्ष मजबूत करायचा आहे.
आम्ही तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. या वेळी कोकण काबीज करायचे आहे. पाहूया कोण आम्हाला थांबवणार आहे. आम्हाला शेतकरी आणि वेगवेगळ्या भागातील लोक आम्ही अडकलो आहोत असे फोन करून सांगतात. लोकांना माहित आहे की आश्वासन पूर्ण करणारा पक्ष शिवसेनेचा आहे.मी लवकरच कोकणाला भेट देणार आहे.
Edited By - Priya Dixit