संतापजनक, चक्क कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार, एकाला अटक
मुंबईतील नालासोपारामध्ये एका विकृत युवकाने आपल्या वासनेची भूक मिटविण्यासाठी चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मागील १० दिवसापासून हा तरुण दोन कुत्र्यांवर अत्याचार करत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नालासोपारा पश्चिम येथील निळेमोरे परिसरात एका २२ वर्षीय तरुणाने आपली वासनेची भूक भागवण्यासाठी चक्क २ कुत्र्यांवर मागील १० दिवसांपासून बलात्कार करत असल्याची माहिती प्राणीमित्र प्रेम गोराडिया यांनी दिली आहे. या युवकावर प्राणीमित्र मागील १० दिवसापासून पाळत ठेवून होते. पण कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्यांनी यावर कोणतही कारवाई केली नाही. पण रविवारी दुपारी हा युवक कुत्रीला घेवून सुनसान ठिकाणी घेवून जात असताना एकाने व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यावरून या युवकावर नालासोपारा पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाचे नाव इरफान बागवान असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.