गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (13:41 IST)

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांचा अटकेपूर्व जामीन मंजूर

vaman mhatre
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बदलापूरचे नेते वामन म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. त्यांनी एका महिला पत्रकारावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 

 महिला पत्रकाराने या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अट्रासिटीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी वामन म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज केला होता. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.   

ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूरचे माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनी ऑगस्ट महिन्यात दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे वार्तांकन करताना महिला पत्रकारावर आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा विनय भंग केल्याचा आरोप करत महिलेने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली.

पत्रकारांची प्रतिष्ठेचा अपमान केल्याचे एफआयआर मध्ये म्हटले होते. या वर म्हात्रे यांनी अटकपूर्व जमीन याचिका दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकेपूर्व जामीन मंजूर केला.
Edited by - Priya Dixit