सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (15:31 IST)

सोमय्या यांची जखम ही कृत्रिम : किशोरी पेडणेकर

kishori pednekar
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेक केली, असे सांगत मला मारण्यासाठी कट होता, असा दावा त्यांनी केला होता. त्याचवेळी मला मोठी जखम झाली, असे म्हटले होते. मात्र, सोमय्या यांची जखम ही कृत्रिम असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणकर यांनी केला आहे. सोमय्या यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं घडवून आणलं. ही जखम नाही, तसेच साधा ओरखडाही म्हणता येणार नाही, असेही पेडणेकर  म्हणाल्या.
 
शनिवारी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल भाभा हॉस्पिटलकडून मुंबई पोलिसांना सादर करण्यात आला आहे. सोमय्यांची जखम 0.1 सेमीचा कट आहे. सूज नाही, रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात नाही, असं अहवालात म्हटले आहे. तसेच कोणतीही मोठी दुखापत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. हल्ला झाला त्यावेळी सोमय्या यांनी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता.