संबंधित माहिती
- पालघरच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
- वर्धा जिल्ह्यत एमबीबीएसच्या विद्यार्थिनींची चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
- पालघर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींची स्वतःला पेटवत आत्महत्या
- 14 व्या मजल्यावरून उडी घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
- अनुत्तीर्ण झाल्याने संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहाच्या खोलीत मृतदेह आढळला
ठाण्यात शाळेजवळ झाडाला गळफास लावून विद्यार्थ्यांची आत्महत्या
ठाणे जिल्ह्यातील एका निवासी शाळेजवळ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेजवळच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
शनिवारी मुरबाड परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी विद्यार्थ्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत बघितले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थली पोहोचन मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्याने आत्महत्या का केली अद्याप हे समजू शकले नाही.
मयत मुलगा शेजारील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खैरेपाड़ा येथील रहिवासी असून अनुदानित आदिवासी आश्रमशालेचा विद्यार्थी होता. टोकावडे पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांनी सांगितले की, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit
