बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:48 IST)

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला विद्यार्थ्यांनी घेराव केला

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद आहे. शाळेचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. परीक्षा ऑनलाइनच घेण्यात यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत जमून मुंबईत राज्यशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराच्या बाहेर घेराव टाकत राज्य सरकारच्या विरोधात घोषबाजी सुरु केली आहे. पोलिसांनी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाले आहे. 
 
कोरोनाकाळात परीक्षा ऑनलाईन व्हावी अशी मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन होणार अशी बातमी दिल्यावर विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध करत आज मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर घेराव केला. आता या वर राज्य सरकार काय निर्णय घेते या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.