मुलाला वाचविण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला
एक बाप आपल्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असतो. मग जिथे गोष्ट त्याच्या लेकरांच्या आयुष्याशी असेल तर तो स्वतःचे प्राण देखील देण्यास तयार असतो असेच काही घडले आहे. मुंबईतील आरे कॉलोनीत. इथे एका बापाने आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. गेल्या काही दिवसांपासून बिबट्ये मोकाट फिरून नागरिकांवर हल्ला करण्याची घटना घडत आहे. हे बिबटे लहान मुलांना आपला शिकार करत आहे. असेच काहीसे घडले आहे मुंबईतील आरे कॉलोनीत इथे एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. रोहित असे या मुलाचे नाव आहे. पण वेळीच मुलाचा वडिलांनी बिबट्याला रोखल्यामुळे रोहितचे प्राण वाचले. रोहित हा 8 वर्षाचा मुलगा दुकानावर काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी कुठूनतरी एक बिबटा आला आणि त्याने रोहितवर झडप टाकली. त्याने रोहितचा पाय आपल्या जबड्यात पकडून नेऊ लागला. घाबरलेल्या रोहितने आरडाओरड केली. त्याच्या आवाज ऐकून त्याचे वडील बाहेर आले आणि त्यांनी रोहितला बिबट्याच्या जबड्यात अडकलेले बघितले. त्यांनी प्रसंगावधान राखून बिबट्याच्या डोळ्यात टॉर्चचा प्रकाश टाकला. बिबट्याने घाबरून रोहितला सोडले आणि पसार झाला. अशा प्रकारे वडिलांनी मृत्यूच्या तावडीतून आपल्या मुलाला सुखरूप वाचवले. या अपघातात रोहितच्या पायाला दुखापत झाली आहे. रोहितच्या वडिलांच्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचले.