गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (09:26 IST)

चुकीचे इंजेक्शन दिल्याने चिमुकल्याचा मृत्यू

baby  died due to wrong injection चुकीचे इंजेक्शन दिल्याने चिमुकल्याचा मृत्यू Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
चिमुकल्याला चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्याचा क्षणातच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मुंबईतील गोवंडीच्या बैगनवाडीतील एका नर्सिंगहोम मध्ये घडली आहे. या प्रकरणी नर्सिंगहोम च्या सफाई कर्मचारी, डॉक्टर ,आरएमओ आणि नर्स वर गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवरी रोजी लहानग्या ताहा खान याला ताप आल्यामुळे  बैगनवाडीतील नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरने जाण्यापूर्वी आरएमओला एका इतर रुग्णाला एजिथ्रोमायसिनचे इंजेक्शन देण्यास सांगितले. आरएमओ त्यादिवशी नर्सिंग होम मध्ये नसल्याने आरएमओ ने एका नर्सला चिमुकल्याला औषध देण्यास सांगितले. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्याने आपण बाळाला औषध आणि इंजेक्शन एकत्र देऊ असे सांगितले आणि त्याने तसे दिल्यावर क्षणातच त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात हा आरोपी सफाई कर्मचारी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर बाळ न्याय कायदा लागू  करून गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नाही.