सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:28 IST)

आता ठाणे पोलिसांनी कालीचरण महाराजांना अटक केली

Kalicharan
महाराष्ट्रातील ठाणे शहर पोलिसांनी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांना छत्तीसगडमधून अटक केली आहे. महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना बुधवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली होती. येथे त्यांना अशाच एका प्रकरणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्यांना टान्झिट रिमांडवर ठाण्यात आणण्यात आले आहे.
 
गतवर्षी 26 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात कालीचरण महाराज यांना महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी रायपूर पोलिसांनी अटक केली होती. तर 12 जानेवारी रोजी वर्धा पोलिसांनी अशाच एका प्रकरणात त्यांना अटक केली.

NCP नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपिता विरुद्ध केलेल्या कथित वक्तव्याच्या तक्रारीच्या आधारे कालीचरण यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना रायपूर येथून अटक करण्यात आली.