1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (09:21 IST)

Video धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात तोल गेला आणि... घटनेचा व्हिडिओ बघा

मुंबईतील दादर रेल्वेस्थानकातून समोर आलेल्या या धक्कादायक व्हिडिओमध्ये लोकलमध्ये चढण्याच्या घाईत एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या तिकीट तपासणीसने या व्यकतीला वेळेत बाजूला खेचले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
 
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अनेकदा तोल जाण्याची भीती असते अशात प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने आवाहनही केले जातात की घाई करु नये.
 
रेल्वेने ट्विट करत म्हटले की ड्युटीवर असलेले TC श्री नागेंद्र मिश्रा यांनी आज दादर स्टेशनवर चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढताना खाली पडलेल्या एका प्रवाशाचा जीव वाचवला.
प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
 
दादर रेल्वे स्थानकात वरिष्ठ तिकीट तपासणीस असलेले नागेंद्र मिश्रा हे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसचं काम करत होते. तेव्हा त्या प्लॅटफॉर्म शेजारी एक लोकल ट्रेन आली. या लोकलमध्ये एक प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला आणि प्रवाशी खाली कोसळला. नागेंद्र मिश्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ त्या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली. मिश्रा यांनी त्या प्रवाशाला लोकल ट्रेनपासून दूर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.