मेट्रो-३ मार्गावरील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर ४२ वा व प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.
मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले.
मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते, असे मत मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालकअश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor