सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:34 IST)

घातपाताची शक्यता नाकारता येत नाही : उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे. 
 
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 
 
या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली. त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.