नालासोपाऱ्यात वडिलांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने वडिलांचा प्रायव्हेट पार्ट कापला
मुंबईतील पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात एका तरुणीने तिच्या सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापला. आरोपी तरुणीचे सावत्र वडील तिचा दोन वर्षांपासून लैंगिक छळ करत असायचे.
सोमवारी तिच्या वडिलांनी तिच्यावर बळजबरी करत असताना तरुणीला राग आला आणि तिने सावत्र वडिलांचे प्रायव्हेट पार्ट धारदार चाकूने हल्ला करत कापून दिले.या घटनेत तिचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना नालासोपारा पूर्वेतील बावपेठ पाडा परिसरातील सर्वोदय नगर चाळ मध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणीच्या आईने दुसरे लग्न केले होते. तरुणीचे सावत्र वडील तरुणीवर गेल्या 2 वर्षांपासून बलात्कार करत होते. तरुणीने विरोध केला असता त्याने तिच्यावर बळजबरी करून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले.
सोमवारी पीडितेच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने सर्वप्रथम सावत्र वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि संधी मिळतातच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचे प्रायव्हेट पार्ट कापून दिले. वेदनेने तडफडत तिचे वडील घराबाहेर आले मात्र तरुणीने त्याला भररस्त्यात अडवले आणि पुन्हा हल्ला केला. हे पाहून गर्दी झाली. तरुणीने लोकांना सांगितले की माझ्या सावत्र वडिलांनी गेल्या 2 वर्षांनी माझ्यावर बलात्कार केला म्हणून मी हे केलं. लोकांनी तिला समजावत चाकू फेकायला सांगितले.
पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आणि जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशलमिडियावर व्हायरल झाला आहे. या मध्ये तरुणीचा हातात चाकू दिसत आहे आणि आरोपी वडील खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit