रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (09:45 IST)

विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आक्रमक झाला आहे. आज सिडको भवनाला मोठ्या संख्येने घेराव घालण्याचे आवाहन आगरी कोळी समाजाच्या नेत्यांतर्फे करण्यात आलं आहे
 
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. तसंच सिडको कार्यालय परिसर उद्या सकाळी आठ ते रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे. अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. शीव पनवेल आणि ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.