Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही भोगावे लागत आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. देशात सर्व गोष्टी महाग होताना मुंबईचा वडापाव या पासून सुटला नाही. आता मुंबईतला प्रसिद्ध असलेला गरिबांचा बर्गर म्हणजे वडापाव महागला आहे. त्यामुळे आता खवैय्यांना याचा फटका बसणार आहे.
सध्या रशिया -युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. अशा कारणास्तव आता मुंबईत वडापावचे दर दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढले आहे. वडापाव विक्रेत्यांचे म्हणणे आहे की सध्या सिलिंडरच्या किमती वाढल्या आहे ते घेण्यासाठी 2400 रुपये द्यावे लागतात, मिरची 100 रुपये किलोच्या भावाने विकली जात आहे. रिफाईंड तेलासाठी 1500 ते 2400 रुपये मोजवे लागतात. महागाई वाढल्यामुळे आता पूर्वीच्या किमतीत वडापाव देणं परवडणारे नाही म्हणून किमती वाढवल्या आहे.