Last Modified सोमवार, 18 एप्रिल 2022 (16:27 IST)
राज्यात एका 9 वर्षांच्या मुलावर त्याच्या शेजारच्या साडेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उल्हासनगर भागातील आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे की, 3 एप्रिल रोजी खेळण्याच्या बहाण्याने मुलाने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की, मुलाला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.