शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (11:46 IST)

मुंबईत कळस यात्रेत दोन गटात मारामारी, 10 जखमी

दिल्लीतील जहागीरपुरीत धार्मिक हिंसाचारानंतर देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत  देखील धार्मिक कळस यात्रेत दोन गटात वाद झाल्यावर मारामारी होऊन वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी वेळीच स्थितीवर नियंत्र मिळवले. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. 
 
मुंबईतील आरे कॉलोनीतील गौतम नगर भागात काल रात्री शिवमंदिरातील कळस यात्रे दरम्यान दोन गटात तुफान राडा होऊन मारामारी झाली. या घटनेत 8 ते 10  जण जखमी झाले आहे. या प्रकरणात 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सध्या या परिसरात पोलिसांचं कडेकोट बंदोबस्त करण्यात आलं आहे. या परिसरात कलम 144 अंतर्गंत जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात घेतली आहे.