गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 18 एप्रिल 2022 (08:22 IST)

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने कुर्ल्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. रजनी कुडाळकर  (वय, 42) असे त्यांचे नाव आहे.

मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. रजनी या कुडाळकर यांची दुसरी पत्नी होत्या. कुर्ल्याच्या नेहरू नगरमधील राहत्या घरी रात्री 9 च्या सुमारास त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असून, रजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कुडाळकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास करत आहेत.