रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शनिवार, 16 एप्रिल 2022 (15:47 IST)

नाश्त्यात जास्त मीठ घातल्यामुळे पत्नीची हत्या

ठाणे जिल्ह्यातील भाईंदर टाऊनशिपमध्ये एका व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केली, कारण त्याला दिल्या जाणाऱ्या न्याहारीमध्ये मीठ जास्त होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
 
संतापलेल्या नवऱ्याने उचलले पाऊल
ही घटना शुक्रवारी सकाळी भाईंदर पूर्वेतील फाटक रोड परिसरात घडली. पत्नीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव 46 वर्षीय नीलेश घाघ असे आहे.
 
पत्नीची गळा आवळून हत्या
पोलिसांनी सांगितले की, सकाळी 9.30 च्या सुमारास न्याहारी केल्यानंतर आरोपीने पत्नी निर्मला हिचा गळा दाबून खून केला. पत्नीने दिलेल्या खिचडीत जास्त मीठ असल्याने आरोपी नाराज होता.
 
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
त्याने सांगितले की, आरोपीने पत्नीचा कपड्याने गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.