शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (22:52 IST)

ठाण्याच्या सभेला ये, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरे

Raj Thackeray
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यावर वसंत मोरेंनी  नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर मोरे यांना पुणे शहर अध्यक्षपदाला मुकावे लागले होते. यांनतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यांनतर राज ठाकरे यांनी फोन करून वसंत मोरेंना आज शिवतीर्थावर  भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानुसर आज वसंत मोरे राज ठाकरेंना भेटले. यावेळी राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपणही त्यांच्या वक्त्यावर नजराज असल्याचे सांगितले. पण राज यांनी वसंत मोरे यांना ठाण्याच्या सभेला ये तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दोतो, असे म्हणत त्यांना आदेश दिला.
 
दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील विधानावरून नाराज झालेल्या वसंत मोरेंनी आज सोमवारी राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना उद्याच्या ठाण्यातील सभेला ये, तिथे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, असं सांगितलं. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात माहिती दिली.
 
वसंत मोरे म्हणाले, “राज ठाकरेंशी सगळं बोलणं झालं आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेला ये म्हणून बोलावलं. तुला सगळ्या प्रश्नांची ठाण्याला उत्तर मिळतील. उद्याच्या सभेनंतर राज ठाकरे सर्वांशी बोलणार आहेत.” तसेच पुढे त्यांनी बोलताना वसंत मोरे यांनी आपण राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधानी आहे असं सांगितलं. अनेक वावड्या उठवल्या गेल्या. मी सुरुवातीपासून मनसैनिक असल्याचं सांगितलं. मनसेतच राहणार. उद्याची उत्तर सभा आहे त्यामध्ये राज ठाकरे सगळी उत्तरं देतील. त्यानंतर बाकीच्या गोष्टी राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.
 
वसंत मोरेंना राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरेही या सभेत मिळतील असे सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या सभेत काय उत्तरे देणार आणि या उत्तरांमुळे वसंत मोरेंची नाराजी दूर होणार का? हे उद्याची सबभा झाल्यांनंतरच समजणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.