शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (22:30 IST)

उत्तर सभेत राज ठाकरेंचा इशारा, ‘3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवा, नाही तर

raj thackeray
गुढी पाडव्याला राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली. त्यात त्यांनी मशिदीवर लावलेल्या भोंग्याबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय आणि धार्मिक खळबळ उडाली. नंतर त्यांनी ठाण्यात आज 12 एप्रिल रोजी उत्तरसभा घेण्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज ठाण्यात त्यांची उत्तरसभा झाली. त्यात ते म्हणाले.
 
"येत्या 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लावू," असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. ठाण्यात राज ठाकरेंची आज (12 एप्रिल) सभा झाली. 'उत्तर सभा' असं या सभेला नाव देण्यात आलं होतं.
 
"तुम्हाला नमाज पढायचीय, अजान द्यायचीय, घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय?" असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना लक्ष्य केलं.
 
राज ठाकरे म्हणाले, "जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही."
 
"नवरात्रोत्सव असतो, दहा दिवस आपण समजू शकतो. तरीही लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. 365 दिवस तुम्ही लाऊडस्पिकरवरून ऐकवता. कशासाठी, कुणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठचीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही. महाराष्ट्राला स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे, 12 एप्रिल ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मौलवींना बोलवा, सर्व मशिदींवरचे लाऊडस्पिकर उतरवले पाहिजे. 3 मेनंतर तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडून होणार नाही," असं राज ठाकरे म्हणाले.

तसंच, "मतांसाठी वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
 
* सभेकडे येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. इतकी काही आग लावणार नाहीय.
* माझ्या ताफ्याला अडवणार हे गुप्तचर यंत्रणेला माहीत आहे. पण पवार साहेबांच्या घराकडे एसटी कर्मचारी जाणार हे माहीत नव्हतं.
* आपली सभा मोठे स्क्रीन लावून जम्मूमध्येही दाखवली जातेय, अनेक राज्यात दाखवली जातेय. म्हणून जाहीर सभा घेण्याचं ठरवलं.
* गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक नेत्यांनी अकलेचे तारे तोडले. त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पण पत्रकार परिषद घेऊन मला याचं उत्तर द्यायचं नव्हतं.
* ज्यावेळी मी नरेंद्र मोदींवर बोलत होतो, त्यावेळी त्यांच्या भूमिका पटल्या नव्हत्या. उघडपणे बोललो. आता ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला. मला नाही लगत ट्रॅक बदलायला.
* शरद पवार साहेबांना नुसती चाहूल लागली ईडीच्या नोटिशीची, त्यावर केवढं नाटक केलं. या हातानं पापच केलेलं नाही, तर नोटिशी कोणतीही येवो, भीक नाही घालत मी त्यांना.
* 370 कलम रद्द केलं, तेव्हा पहिलं ट्वीट माझं होतं. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा हे बोलणारा पहिला मी होतो.
* नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे की, एक म्हणजे समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल असा कायदा आणा.
* पवारसाहेब आज संजय राऊतांवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल काही सांगता येत नाही. यात बरेच काँग्रेसवाले गेलेले आहेत.
* अजित पवारांवर रेड पडते, तरी नरेंद्र मोदी आणि पवारसाहेबांमध्ये मधुर संबंध राहतात.
* सुप्रिया सुळेंनी बोलू नये. यांचे खायदे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.
* मनसे विझलेला पक्ष नसून, समोरच्या विझवत जाणारा पक्ष आहे
* सगळे म्हणतात, संपलेला पक्ष आहे. तरी बोलतात. रकानेच्या रकाने भरतात, लिहितात.
* अजित पवार म्हणतात, यांना भोंगे आताच आठवले का? याआधी काय झोपा काढत होते का? हे दाखवण्यासाठी मी तीन व्हिडीओ आणले आहेत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो.
* भोंग्यांवर याआधीही बोललो. पण अजित पवारांना ऐकू आलं नसेल. लॉकडाऊनमध्ये कान साफ झाले असतील.
* तुम्हाला नमाज पढायचीय, अजान द्यायचीय, घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय?
* सांगून पटत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार
* पाच पाच वेळा बांग देतात, एकतर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाल्यास रस्ता साफ करतो, फूटपाथवर घाण झाल्यास, फूटपाथ साफ करतो. मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला आमचं सांगणं आहे, आम्ही यातून मागे हटणार नाही, काय करायचं ते करा.
* नवरात्रोत्सव असतो, दहा दिवस आपण समजू शकतो. तरीही लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. 365 दिवस तुम्ही लाऊडस्पिकरवरून ऐकवता. कशासाठी, कुणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठचीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही. महाराष्ट्राला स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे, 12 एप्रिल ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मौलवींना बोलवा, सर्व मशिदींवरचे लाऊडस्पिकर उतरवले पाहिजे. 3 मेनंतर तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडून होणार नाही.
* मतांसाठी वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.
* मुंब्र्यातल्या एकही मदरश्यामध्ये वस्तारा जरी सापडला तरी राजकारण सोडेन. कसा सापडलेल? दाढीच करत नाही. वस्तारा कसा सापडणार. यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. इतके अतिरेकी सापडतायेत.
* शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने सांगावं? की राज ठाकरे भूमिका बदलतो? परदेशी पंतप्रधान चालणार नाही, म्हणत पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. दोन महिन्यात काँग्रेससोबत गेले आणि कृषिमंत्री झाले. असंख्य भूमिका बदलल्याचे सांगता येतील.
* गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम सगळे सरपटले. मग एकच पालुपद लावलं, ईडीची नोटीस आली, ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या संपत्त्या जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या देऊ लागले.
* आमच्या आजोबांनी यांच्यासाठी (संजय राऊत) चांगला शब्द काढला होता, 'लवंडे'. व अक्षरवार अनुस्वार आहे लक्षात ठेवा.
* देशात, महाराष्ट्रात असंख्य जात आहे. प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यानंर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला.
* शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे ते धर्माकडे नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म-बिर्म, देव-बिव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.
* महाराष्ट्राला कुणी हरवू शकलं नव्हतं. महाराष्ट्राला हरवतंय कोण, तर जात. या जाती आपल्याला नष्ट करायला निघाल्यात.
* महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे की, या सर्व भामट्यांपासून दूर राहा. स्वत:ला हव्या असलेल्या पैशांसाठी सर्वांना खड्ड्यात घालतील.