गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (17:42 IST)

मुंबईत दोन गटात हाणामारी; चार जणांना अटक

arrest
मुंबईत पवईत शंकराचार्य मार्गावर रात्री 11 च्या सुमारास येथे मोमोज विक्रेत्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. 
 
या मोमोज विक्रेत्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र हे वाद विकोपाला गेले आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. 

घटना रात्री 11 वाजेच्या सुमारासची आहे. मोमोज विक्रेत्यांच्या दोन गटात काही दिवसांपासून वादावादी होत होती. मात्र काल रात्री या वादावादीचे हाणामारीत रूपांतरण झाले. आणि या घटनेची माहिती मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि स्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीमुळे परिसरातील शांतता भंग झाली आणि रहिवाशींना त्रासाला समोरी जावे लागले. या प्रकरणी परिसरातील शांती भंग करणाऱ्यांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केले आहे. सुदैवाने या हाणामारीत कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच पोहोचून नियंत्रण मिळवले