शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:00 IST)

बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे जाहीर सभा झाली. या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर भाजपची 'टीम बी' असल्याचा आरोप करण्यात आला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली. 
 
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे सज्ज झाले आहेत. १२ तारखेला ठाण्यात होणाऱ्या सभेसाठी ठिकठिकाणी 'उत्तर सभा' असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच, डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी केलाय.
 
 शिवाजी पार्क येथील सभेनंतर शरद पवार यांनी राज यांच्यावर टीका करताना एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात अशी टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी देशात आणखी एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला होता.