शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (16:36 IST)

राज ठाकरे यांच्या नातवाचा फोटो

Raj Thackeray's grandson
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच आजोबा झाल्याची बातमी आली. पुत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. याबातमीमुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. आता या चिमुकल्या राजकुमाराची पहिली झलक पाहण्याची संधी मिळाली आहे.
 
राज ठाकरे यांचा नातू बघण्यासाठी आतुर लोकांना याची पहिली झलक बघायला मिळाली. खुद्द अमित ठाकरे यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
 
या फोटोत बाळानं करंगळी पकडल्याचं स्पष्ट दिसत आहे. तथापि फोटोमध्ये बाळाचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसत नाहीये तरी बाळाची ही पहिली झलक बघायला मिळण्याने चाहत्यांना आनंद होत आहे.
 
सध्या सोशल मीडियावर ठाकरे कुटुंबातील या नव्या सदस्याचा सर्वात पहिला फोटो चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे आणि मिताली यांनी 2019 मध्ये लग्नगाठ बांधली होती.