गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:28 IST)

अरुण गवळीने रजेसाठी नागपूर खंडपीठात घेतली धाव

arun gwali
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने  पॅरोल मिळण्यासाठी  मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे डॉन अरुण गवळी यांनी ही रजा मागितली आहे. अरुण गवळीने रजा मिळविण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता, मात्र तो अर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्याने आता नागपूर खंडपीठात धाव घेतली.
 
अरुण गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, या कारणामुळे हा अर्ज करण्यात नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गवळीने याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २९ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.